या धकाधकीच्या युगात चार शब्द हि बोलायला सावड राहिली नाही घराच्या शेजारी राहणारा हि फक्त रविवारीच भेटतो अस म्हंटल तरी अतिशोक्ती होणार नाही आणि मन मोकळ करायला ब्लॉग शिवाय दुसरा चांगला मित्र नाही.म्हणूनच मी ब्लॉग लिहायला सुरवात केली. पण मझ्या ब्लॉगला वाचकांचा चांगला प्रतिसात मिळावा म्हणून मी अनेक ब्लॉगकट्ट्यांकडे माझे निवेदन पत्र भरले पण ह्या ब्लॉग कट्यावाल्यांची कुणास ठाऊक माझ्याशी काय दुश्मनी होती आतापर्यंत तरी कुणीच माझी दखल घेतली नाही. मी एक मराठी माणूस आहे आणि एकदा का कुण्या मराठीमाणसाच टकोरं फिरलं तर काय होत हे नव्यानेसांगायला नको ....!!!
माझ्या संगे जसी या ब्लॉगकट्यावाल्यांची दुश्मनी आहे तशीच अनेक मराठी बांधवांशी असेल म्हणूनच ठरवलं कि असा ब्लॉगकट्टा बनवायचा जिथे सगळ्या मराठी बांधवांना समावून घेता येईल आणि त्यांना ज्यास्तीचे वाचक मिळून देता येईल हा प्रामाणिक प्रयत्न...!!!!
तुमचा ब्लॉग मराठीनेटभेट वर जोडण्या साठी खालील आटी नियमांची पुर्तता करणे आवश्यक आहे.
१. आपल्या ब्लॉग वर मराठी नोंदी असणे आवश्यक आहे तसेच हिंदी भाषेत लिहलेले ब्लॉग स्वीकारले जातील.
२. मराठीनेटभेट वर आपल्या ब्लॉग मधील लेखांचे, कविताचे शीर्षक दाखवले जाईल.
३. सावधान आपण कुणाच्या नोंदी जश्याच्या तश्या मुळ लेखकाला श्रेय न देता प्रकाशित करत असाल आणि आपली तक्रार मराठीनेटभेट च्या टीम कडे आल्यास मराठीनेटभेट मधून तो ब्लॉग काढून टाकण्यात येईल.
४. अश्लील साहित्य प्रकाशित करणारा ब्लॉग येथे जोडला जाणार नाही..आधीच जोडलेल्या ब्लोगवर भविष्यात असे प्रकार आढल्यास तो ब्लॉग मराठीनेटभेट मधून तो ब्लॉग काढून टाकण्यात येईल.
५. इतरांच्या धार्मिक भावना दुखवणारा ब्लॉग येथे जोडला जाणार नाही असा प्रकार निर्देशनास आल्यास तो ब्लॉग मराठीनेटभेट मधून काढून टाकण्यात येईल.
६. विद्रोही साहित्य असलेला ब्लॉग जोडण्यात येईल.
७.मराठी नेटभेट चे विजेत आपल्या ब्लॉग वर लावणे अनिवार्य आहे नसतो आपला ब्लॉग येथे जोडण्यात येणार नाही.
८.आपला ब्लॉग येथ जोडण्या साठी आपल्या ब्लोगला फीड दिलेली असणे अवश्यक.
९.खाली दिलेल्या मराठीनेट भेट ब्लॉगकट्ट्याच्या विजेट ला क्किक करून आपला निवेदन फॉर्म भरा
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा